बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 जानेवारी 2019 (08:52 IST)

आता विमानतळासारखी हायटेक सुरक्षा रेल्वे स्थानकांवर

विमानतळाच्या धर्तीवर प्रवाशांना हायटेक सुरक्षा देण्यासाठी आता 202 रेल्वे स्थानकांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील अलाहाबाद आणि कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकात या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली. त्यामुळे रेल्वे गाडीपर्यंत पोहोचण्यास वेळ होऊ नये म्हणून प्रवाशांना तपासणीसाठी किमान 20 मिनिटे आधी स्थानकात यावे लागणार आहे. 
 
2‘आयएसएस’अंतर्गत 202 स्थानकांच्या सुरक्षेसाठी 385.06 कोटी रुपये खर्च केले जातील. स्टेशनवर देखरेख यंत्रणा अधिक बळकट केली जाईल. प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यापूर्वी प्रवाशांची विविध पातळीवर तपासणी करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.