शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (09:30 IST)

भाजप शिवसेनेचे माध्यमांसमोरचे भांडण म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक

निव्वळ आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारकडून दिलेली वचने पूर्ण होत नसल्याने माध्यमासमोर खोटी भांडणे करून देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत दिशाभूल केली जात असल्याची टीका नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तयार करण्यात आलेल्या एनसीपी कनेक्ट या अॅपची माहिती देण्यासाठी तसेच बूथ कमिट्या अधिक बळकट करण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गणनिहाय दौरा करत आहे. आज त्यांनी नाशिक तालुक्याचा दौरा केला.  यावेळी गिरणारे गण - मातोरी, देवरगाव गण -धोंडेगाव, गौवर्धन गण, विल्होळी गण, पिंप्री सय्यद गण,एकलहरे गण,  पळसे गण व लहवित गणाचा आढावा घेण्यात आला.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, प्रत्येक गावातील नागरिकांशी कनेक्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एनसीपी कनेक्ट हे अॅप तयार केले असून या माध्यमातून प्रत्येक नागरीक पक्षाशी जोडला जाणार असून त्यात्या भागातील नागरिकांच्या समस्या समजणार आहे. कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी जोडण्यासाठी एनसीपी कनेक्ट हे अॅप महत्वाचा दुवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील दरी देखील या माध्यमातून कमी होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले की, शिवसेना भाजप सरकारने देशातील जनतेचे स्वप्नभंग केले आहे. शेतकरी, युवक, महिला यांचे प्रश्न युती सरकारला सोडवता आले नाही. सद्याच्या सरकारकडून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतमालाचे भाव पडले असतांना सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची परिस्थिती आहे. देशातील दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले असतांना आद्यपपर्यंत १५ लाख लोकांना देखील रोजगार देऊ शकले नाही. केवळ घोषणाबाजी करणारे सरकार कडून प्रत्यक्ष कृती मात्र होताना दिसत नाही. आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासाची कामे झाली मात्र युती सरकारच्या काळात विकास खुंटला आहे.जिल्हा आणि तालुका प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्याला सरकार बदलण्याची गरज आहे. त्यामुळे आघाडीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले आहे.