रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जानेवारी 2019 (16:50 IST)

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या मुलाखतीवर राज यांनी आपल्या खास शैलीतून खरपूस समाचार घेतला. राज यांनी काढलेल्या व्यगंचित्राचा मथळाच 'एक मनमोकळी मुलाखत' असा आहे. या व्यगंचित्रात नरेंद्र मोदी हे स्वत:च स्वत:ची मुलाखत घेत असल्याचे दाखवले आहे. तर या मुलाखतीत मोदी स्वत:लाच 'बोला काय विचारू? अशी विचारणा करत आहेत, असे दर्शवले आहे. या व्यगंचित्रात मोदींचे परदेश दौरे, सरदार पटेल यांचा पुतळा, ड्रमवादन असे मोदीमय वातावरण दाखवले आहे. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी राफेल विमान करार, पाच राज्यातील निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, सर्जिकल स्ट्राइक यांसह विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली होती.