भाजपा-सेना युतीबाबत अद्याप निर्णय नाही : दानवे
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपा-सेना युतीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच युतीसंदर्भातील निर्णयाला कुठलीही कालमर्यादा नसते, गेल्यावेळेस 2 दिवस अगोदर आमची युती तुटली. त्यामुळे अद्याप केवळ चर्चा सुरू आहे, पण कुठलाही प्रस्ताव भाजपाकडून शिवसेनेला देण्यात आला नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.
दुसरीकडे भाजपाने 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला असून स्वबळाची तयारी केल्याचं समजते. शिवसेनेला युतीबाबतचा अद्याप प्रस्ताव दिलेला नाही, प्रस्ताव देऊन लवकरच बोलणी सुरू होईल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतविभाजन टाळले पाहिजे, असे म्हणत दानवेंनी युतीचे संकेत दिले आहेत.