बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जानेवारी 2019 (09:12 IST)

नागपुरात कायदा-सुव्यवस्थेची ऐशी-तैशी - गृहमंत्र्यांच्या गावी नववर्षाला रक्तरंजित सलामी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्रीही आहेत. त्यांच्या नागपुरात कायदा-सुव्यवस्थेची ऐशी-तैशी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण, कायद्याचं राज्य नसल्याने, गुंड-पुंडांना कायद्याची भीती न राहिल्याने दोन हत्यांनी नववर्षाला सलामी मिळाली आहे.
 
एमआयडीसी परिसरात दोन गुंडांच्या टोळ्या एकमेकांसमोर भिडल्या. दोघांवर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे इमामवाडा भागात एका तरुणाला टोळक्याकडून मारण्यात आलंय. अक्षय वाघमारे व रणजित धानेश्वर अशी मृतांची नावं आहेत. नागपुरातल्या कायदा-सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ या दोन हत्यांमुळे पुन्हा ऐरणीवर आलाय अशी टीका सरकारवर राष्ट्रवादी कॉंग्रेस ने केली आहे.