गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 31 डिसेंबर 2018 (17:04 IST)

शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज

अहमदनगर महामार्गावर कोरेगाव- भिमा येथे उद्या शौर्यदिन साजरा होणार असल्याने या महामार्गावर वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा महामार्गावर तैनात करण्यात आला आहे. सदरच्या परिसरात गर्दी होऊ नये यासाठी जाण्या-येण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले आहे. सकाळच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. विजयस्तंभ परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेराच्या मदतीने नजर ठेवली जात असून या भागात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहे. 
 
दरम्यान, विजयस्तंभाची सजावट सुरु आहे. तर कोरेगाव- भीमा येथे उद्या कोणताही अनुच्चित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. कोरेगाव भीमाच्या चारही बाजून आठ किलोमीटरच्या परिसरात ११ ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने नजर ठेवली जाणार असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.