शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 जानेवारी 2019 (09:38 IST)

आनंदाची बातमी इंदापूर ते इनजे मार्गावर रेल्वे धावणार, कोकणात नवीन दहा स्थानके

कोकणात रेल्वेच्या बाबतीत नेहमीच ओरड असते, या मार्गावर रेल्वे वाढावी अशी मागणी नेहमी प्रवासी वर्ग करत असतो. कोकण रेल्वेमार्गावर दोनच मार्गिका असल्याने सुट्टीच्या वेळी आणि गर्दीच्या काळात जादा गाड्या सोडल्यावर कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होते.सुट्टीच्या वेळी आणि गर्दीच्या काळात जादा गाड्या सोडल्यावर कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून या वर्षी कोकण रेल्वेमार्गावर आणखी दहा स्थानके निर्माण करण्यात येणार आहेत.
 
कोकण रेल्वेमार्गावर एकूण ६७ स्थानके आहेत. यात आता १० स्थानकांची भर पडणार आहे. इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामाने, कालबनी, कडवई, वेरवली, खारेपाटण, अर्चिणे, मिरजन, इनजे ही १० स्थानके आहेत. याशिवाय कोकण रेल्वे प्रशासन आणखी २१ स्थानके बनविण्याच्या तयारीत आहे. क्रॉसिंग स्टेशन ही संकल्पना मांडून क्रॉसिंग स्थानके बनविण्यात येणार आहेत. ही १० स्थानके लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. क्रॉसिंग स्थानके बनविण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. या वर्षात ही स्थानके प्रवाशांच्या सेवेत असतील, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे, सोबतचा वेळ देखील वाचणार असून यामुळे नक्कीच रेल्व्वेवरील ताण कमी होणार आहे.