बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 डिसेंबर 2018 (09:29 IST)

नेपाळ : भारताच्या फक्त १०० च्या नोटा चालतील

नेपाळमध्ये आता भारतीय चलनातल्या 200, 500 व 2000 रुपयांच्या नोटा चालणार नसल्याची घोषणा नेपाळ सरकारने केली आहे. आता भारतीय  चलनातील 100 रुपयांपर्यंतचीच नोट नेपाळमध्ये चालणार आहे. त्यामुळे नेपाळ सरकारने भारतीय  चलनातील 200, 500 व 2000 रुपयांच्या नोटांचा वापर व्यवहारात न करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. नेपाळ सरकारचे प्रवक्ते गोकुल प्रसाद बास्कोटा यांनी याबाबतची माहिती गुरुवारी दिली. दरम्यान भारत  सरकारच्या आग्रहास्तव नेपाळने हे निर्बंध लावले असल्याचे सांगण्यात येत आहे.