शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: एडिलेड , सोमवार, 10 डिसेंबर 2018 (11:24 IST)

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली

भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून आपल्या नावावर केला.  
 
विराट कोहली याच्या कप्तानीत ऑस्ट्रेलियाई धरतीवर भारताने प्रथमच टेस्ट मॅच जिंकले आहे. 15 वर्षांनंतर आता भारतीय संघाने या मैदानावर आपल्या विजयाची नोंद केली आहे. या अगोदर 2003मध्ये राहुल द्रविडाने या मैदानावर टीम इंडियाला 4 विकेटने विजय मिळवून दिला होता.  
 
महत्त्वाचे म्हणजे कर्णधार विराट कोहलीच्या हाताखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाई धरतीवर पहिल्यांदा 4 सामन्यांची मालिका खेळत आहे.   मालिकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 291 धावांवर संपुष्टात  आणून या सामन्याला 31 धावांनी आपल्या नावावर केला.  
 
पहिल्या डावाचा शतकधारी चेतेश्वतर पुजारा (71) आणि उपकप्तान अजिंक्य राहणे (70) यांच्या शानदार अर्धशतकांनंतर गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या क्रिकेट सामन्यात विजयाची उमेद दिसू लागली होती.  
 
भारताने सामन्याच्या चवथ्या दिवशी रविवारी आपल्या दुसर्‍या डावात 307 धावा बनवल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी 323 धावांचे लक्ष्य ठेवले, ज्याच्या पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने चार विकेट गमावून 104 धावा काढल्या.