सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जानेवारी 2019 (08:48 IST)

राज्यस्थरीय नाशिक पेलेटॉन 2018 : ओलेकर, शेंडगे, अहिरे, निकम यांची बाजी सांगली, पुणे, मुंबई, सायकलपटूंचा बोलबाला

दातार कॅन्सर जेनेटिक्स प्रस्तुत नाशिक सायकलिस्टतर्फे आयोजित जायंट स्टारकेन 'नाशिक पेलेटॉन 2018' स्पर्धेत 150 किमी पुरुषांच्या 18 ते 30 या वयोगटात सांगलीच्या प्रकाश ओलेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यापाठोपाठ पुण्याच्या विठ्ठल भोसले आणि नाशिककर भारत सोनवणे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत बाजी मारली. तर घाटाचा राजा हा जसपालसिंग मेमोरियल चषक सांगलीच्याच दिलीप माने याने पटकावला. कसारा घाटाचे 8 किमीचे अंतर 22 मिनिट आणि 7 सेकंदात पूर्ण केले.दरवर्षी सांघिक प्रकारात घेण्यात येणारी पेलेटॉन स्पर्धा वैयक्तिक प्रकारात घेण्यात आली. कुलंग अलंग शिखराचा पायथा, भावली धरण, कसारा घाट अशा नाशिक जिल्ह्यातील विविध निसर्गरम्य वातावरणातील मार्गावरून ही स्पर्धा पार पडली.
30 ते 40 वर्षे वयोगटात रमेश शेंडगे यांनी प्रथम क्रमांक पटकावत स्पर्धेतील सांगलीचे वर्चस्व सिद्ध केले. तर मुंबईचे अनुप पवार यांनी द्वितीय आणि नाशिकच्या राजेश मुळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 40 ते 50 वयवर्षे गटात नाशिककर हिरामण अहिरे प्रथम तर सांगलीचे राम जाधव यांनी द्वितीय तर अमरावतीचे नितीन डहाके यांनी तृतीय क्रमांक मिळवला. 50 वर्षाहून अधिक वयवर्षे गटात नाशिकच्या माणिक निकम यांनी बाजी मारली. प्रशांत तिकडे (पुणे), महावीर गौरी (मुंबई) हे द्वितीय आणि तृतीय क्रमांकवर राहिले.महिलांच्या विविध गटांत डॉ. उषा चोपडे, अवंती बिनीवाले, योगिता घुमरे, प्रांजळ पाटोळे आणि अनुजा उगले यांनी 150 किमीची पेलेटॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. एकूण 25 हुन अधिक महिलांनी 150 किमीच्या पेलेटॉन मध्ये सहभाग नोंदवला होता.
सर्व विजेत्यांचा प्रसिद्ध सिने दिग्दर्शक राजकुमार संतोषी, महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी, आयपीएस अधिकारी हरीश बैजल, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांच्याहस्ते प्रमाणपत्र, रोख रक्कम आणि सायकल अशा स्वरूपाचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी 2018 मध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या नाशिकमधील सायकलिस्टचा सन्मान करण्यात आला. यात कबड्डी प्रशिक्षिका शैलजा जैन, डॉ. महेंद्र महाजन, देविदास - प्रतिभा आहेर दाम्पत्य, मोहिंदर सिंग, किशोर काळे, विजय काळे यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना तुषार गांधी यांनी साबरमती येथे 10 दिवसात 19 अर्ध मॅरेथॉन, 5 दिवसात 400 किमी धावणे, तसेच एका दिवसात 71 किमी धावणे, तसेच 3 दिवस 400 किमी सायकलिंग, 28 तास सलग सायकलिंग करणे अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करत असल्याची माहिती दिली. ही जगातील एकमेव हेरिटेज राईड असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रथम क्रमांकाने विजेत्या सायकलिस्टना ३१ हजाराचे रोख बक्षीस तर प्रत्येकी ६९ हजार रुपये किमतीची सायकल बक्षीस देण्यात आल्या. तर द्वितीय क्रमांकांना प्रत्येकी २१ हजार रोख आणि रुपये ३० हजार किमतीची सायकल आणि तृतीय क्रमांकाला रुपये ११ हजार रोख अधिक रुपये २५ हजार किमतीची सायकल अशा स्वरुपात बक्षिसे देण्यात आले.शनिवारी (दि. 5) चार गटांत झालेल्या 50 किमीच्या मिनी पेलेटॉन मध्ये 18 ते 40 वयोगट पुरुषांत सुरतचे सचिन शर्मा यांनी पहिला तर महिलांत अहमदनगरच्या प्रणिता सोमणने बाजी मारली.40 वर्षावरील वयोगट पुरुषांत यवतमाळचे नितीन डहाके यांनी बाजी मारली. तर महिलांत पुण्याच्या अवंती बिनीवाले, नाशिकच्या नंदा गायकवाड आणि कल्पना कुशारे यांनी पहिल्या तिघींत स्थान पटकावले.पुरस्कार वितरण प्रसंगी सचिव नितीन भोसले, शैलेश राजहंस, योगेश शिंदे, रेस डायरेक्टर डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, ऍड. वैभव शेटे, मोहन देसाई आदी उपस्थित होते.
 
असा आहे नाशिक पेलेटॉन 2019 स्पर्धेचा निकाल :
 
150 किलोमीटर पेलेटॉन स्पर्धा : 
नाशिक (सिटी सेंटर मॉल) - वाडीवर्हे चौक - घोटी फाटा – टोल नाका - भावली डॅम फाटा - कसारा घाट - तेथून यूटर्न - घाटन देवी - भावली डॅम - आंबेवाडी गाव - वासाळी फाटा - घोटी कडे पिंपळगाव मोर - घोटी - नाशिक (हॉटेल गेटवे)
 
18 ते 30 वयवर्षे गट : (पुरुष)
प्रथम : प्रकाश ओलेकर, सांगली
द्वितीय : विठ्ठल भोसले, पुणे
तृतीय : भारत सोनवणे, नाशिक
 
30 ते 40 वयवर्षे गट : (पुरुष)
प्रथम : रमेश शेंडगे, सांगली
द्वितीय : अनुप पवार, मुंबई
तृतीय : राजेश मुळे, नाशिक
 
40 ते 50 वयवर्षे गट : (पुरुष)
प्रथम : हिरामण अहिरे, नाशिक
द्वितीय : राम जाधव, सांगली
तृतीय : नितीन डहाके, अमरावती
 
50 वर्षापुढील गट : (पुरुष)
प्रथम : माणिक निकम, नाशिक
द्वितीय : प्रशांत तिकडे, पुणे
तृतीय : महावीर गौरी, मुंबई
 
 
मिनी पेलेटॉन : 50 किमी
18 ते 40 वयोगट
पुरुष : सचिन शर्मा (सुरत), रमेश शेंडगे (सांगली), निलय मुधाळे (कोल्हापूर)
महिला : प्रणिता सोमण (अहमदनगर), रितिका गायकवाड, प्रांजळ पाटोळे (नाशिक)
 
40 वर्षांपुढील गट :
पुरुष : नितीन डहाके (यवतमाळ), समीर नागवेकर (मुंबई),  प्रशांत तिडके (पुणे)
महिला : अवंती बिनीवाले (पुणे), नंदा गायकवाड, कल्पना कुशारे (नाशिक)
 
 
स्प्रिंट पेलेटॉन : 15 किमी
 
12 ते 15 वर्षांखालील गट
मुले : सिद्धेश पाटील (कोल्हापूर), विजय पाटील, उज्वल ठाकरे (ठाणे) 
मुली : सुजाता वाघेरे (नाशिक), केतकी कदम (सातारा), लीना गंत (नाशिक)
 
16 ते 18 वर्षे गट :
मुली : गायत्री लोढे (अहमदनगर), अनुजा उगले (नाशिक)
मुले : सौरभ काजळे (ठाणे), जतीन जोशी, ओम महाजन (नाशिक)
 
'जसपालसिंग विर्दी' घाटाचा राजा स्मृती चषक किताब : दिलीप माने (सांगली)