1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 जानेवारी 2019 (08:46 IST)

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी दोन दिवसापासून संपावर

rimbakeshwar Devasthan
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी हे मंगळवारपासून दोन दिवसापासून संपावर गेले आहेत. सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान सेवेत कायम स्वरुपी करणे आदी मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी संप पुकारला आहे. मात्र देवस्थान ट्रस्टचे विश्वस्तसह अधिकारी यांनी स्वतः कर्मचारी यांचे काम करत भाविकांना गैरसोय होऊ दिली नसल्याने संपाचा भाविकांना त्यांचा त्रास झाला नाही.
 
देशपातळीवर कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपात त्र्यंबकेश्वर देवस्थान कर्मचारी संघटना उतरली असल्याने प्रथमच त्र्यंबकेश्वर मंदिरात कर्मचारी नसल्याने भाविकांना त्यांचा त्रास सहन करावा लागणार असे वाटत असताना विश्वस्त संतोष कदम यांच्यासह अधिकारी वर्ग दिवसभर मंदिरात ठाण मांडून बसत कर्मचारी यांचे काम करत होते. त्याच सोबत तुंगार ट्रस्टचे कर्मचारी व माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार, प्रशांत तुंगार हे ही दर्शन रांगेत उभा असल्याचे दिसून येत होते.