संबंधित माहिती
- ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची कविता तुफान व्हायरल
- सुप्रिया सुळेंची मागणी मान्य करुन जितेंद्र आव्हाडांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- टाटा कॅन्सर रुग्णालयासाठी म्हाडाकडून १०० फ्लॅट्स, जितेंद्र आव्हाडांची घोषणा
- जितेंद्र आव्हाड : 'नशीब रश्मी शुक्लांचं 'ते' पत्र आम्ही परत दिलं नाही'
- आमदार रोहित पवार यांची फडणवीसांसह भाजप नेत्यांवर जोरदार टीका
जितेंद्र आव्हाड यांचा भाजपा नेत्यांना टोला
ब्रुक फार्मा कंपनीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपा नेत्यांमध्ये वादविवाद सुरू आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला असून, एकत्रित येऊन काम करण्याचं आवाहन केलं आहे.
“ब्रुक फार्मा या कंपनीचं साठेबाजी करणं आणि औषधी काळ्या बाजारात विकणं त्यांचा धंदा जोरात आहे. गुजरातमध्येच त्यांच्यावर केस झाली आहे. महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावं याची गरज आहे. हे लहान पोरांसारख माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस. रागाच्या भरात चूक झाली असेल…,” असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावला आहे.
