संबंधित माहिती
- शिवसेना : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आतापर्यंत काय काय घडलं? वाचा 10 महत्त्वाच्या घटना
- Maharashtra political crisis महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वादळ उठू शकते, काँग्रेस नेते BJPच्या संपर्कात
- Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
- Maharashtra Political Crisis LIVE Updates राज्यपालांनी बोलवले विधीमंडळाचे विशेष अधिवेशन; ठाकरे सरकारची अग्नीपरीक्षा उद्याच
- Maharashtra Political Crisis: फ्लोर टेस्टच्या आदेशाला शिवसेनेचे SC मध्ये आव्हान, 5 वाजता होणार सुनावणी
Maharashtra Political Crisis महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष खटल्याची सुनावणी आता 7 जणांच्या खंडपीठाकडे
Maharashtra Political Crisis महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे. या खटल्याची सुनावणी आता 7 जणांच्या खंडपीठाकडे देण्यात आली आहे.
नबाम राबिया प्रकरण या खटल्यात लागू होत नाही, असं नमूद करत या खटल्याची सुनावणी आता 7 जणांच्या खंडपीठाकडे देण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाने निकालपत्राचं वाचन करताना सुरुवातीला सांगितलं की "2016 मध्ये आलेल्या नेबाम रेबिया हे मोठ्या घटनापीठाकडे पाठवणं गरजेचं आहे." विधानसभा अध्यक्षाला हटवण्याची नोटीस दिल्याने अपात्रतेच्या नोटिस जारी करण्याच्या अधिकारांवर मर्यादा येईल की नाही यासारख्या मुद्द्यांवर मोठ्या खंडपीठाने तपासणी करणे आवश्यक आहे, असं मत कोर्टाने नोंदवलं आहे.
गेल्या 10 महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होती. यावर सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टातील घटनापीठाने 16 फेब्रुवारीपासून राखून ठेवला होता.
21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनं सुरू झालेला हा सत्तासंघर्ष अखेर कोर्टात गेला. त्यानंतर 23 ऑगस्टला सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची व्यापती आणि गांभीर्य लक्षात घेता ते 5 सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवलं होतं.
