रविवार, 25 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 29 जून 2022 (15:38 IST)

Maharashtra Political Crisis LIVE Updates राज्यपालांनी बोलवले विधीमंडळाचे विशेष अधिवेशन; ठाकरे सरकारची अग्नीपरीक्षा उद्याच

महाराष्ट्राच्या राजकीय संकट: गुवाहाटी येथे मुक्कामी असलेले बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनीही मुंबईत येण्याचे संकेत दिले आहेत. 30 जून रोजी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. जाणून घ्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचे क्षणोक्षणी अपडेट्स...

03:34 PM, 29th Jun
आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही; ट्विट करत बंडखोर आमदारांचे स्पष्टीकरण

03:07 PM, 29th Jun
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अखेर राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे फर्मान काढले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री राज्यपालांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे फडणवीस यांनी राज्यपालांना सांगितले. राज्य सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती फडणवीस यांच्यासह भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांकडे पत्राद्वारे केली. त्याची दखल तत्काळ राज्यपालांनी घेतली. त्यानुसार, आज सकाळीच राज्यपालांनी एक फर्मान काढले आहे.

02:40 PM, 29th Jun
महाराष्ट्रात राजकीय खल सुरूच आहे. आता भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. या नेत्यांच्या नावांमध्ये प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. राज्यात उद्यापासून फ्लोर टेस्टची तयारी सुरू आहे. एकीकडे शिवसेनेने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचवेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत.

02:19 PM, 29th Jun
शिवसेना आमदार एकनाथ शिंदे म्हणाले, 'आम्ही उद्या मुंबईत पोहोचू. 50 आमदार आमच्यासोबत आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. आम्हाला कोणत्याही फ्लोअर टेस्टची चिंता नाही. आम्ही सर्व गोष्टींवर मात करू, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते आणि ते आपल्याकडे आहे.

01:10 PM, 29th Jun
फ्लोअर टेस्टच्या आदेशाला शिवसेनेने SC मध्ये आव्हान, 5 वाजता होणार सुनावणी

शिवसेनेच्यावतीने याचिका दाखल करणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांना न्यायालयाने त्यांच्या याचिकेची प्रत न्यायालयासह सर्व पक्षकारांना दुपारी 3 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.