शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (11:09 IST)

Maharashtra Political Crisis: फ्लोर टेस्टच्या आदेशाला शिवसेनेचे SC मध्ये आव्हान, 5 वाजता होणार सुनावणी

महाराष्ट्र विधानसभेत गुरुवारी फ्लोर टेस्ट घेण्याच्या राज्यपालांच्या आदेशाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशाविरोधात शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे.यावर सर्वोच्च न्यायालयाने आज संध्याकाळी 5 वाजता सुनावणीची वेळ निश्चित केली आहे.यासोबतच न्यायालयाने सर्व पक्षकारांना दुपारी 3 वाजेपर्यंत अर्जाची प्रत देण्यास सांगितले आहे. 
 
ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी शिवसेनेची बाजू मांडणार आहेत.राज्यपालांच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्याची गरज असून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.फ्लोअर टेस्टच्या आदेशाला विरोध करताना संजय राऊत म्हणाले की, हा निर्णय घटनाबाह्य असून याद्वारे नियमांची पायमल्ली केली जात आहे.
 
संजय राऊत म्हणाले, ""सध्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.अशा स्थितीत त्याआधी फ्लोअर टेस्टचा आदेश देणे चुकीचे आणि पूर्णत: घटनाबाह्य आहे.ते म्हणाले की, भाजपकडून राज्यपाल सभागृहातून राजकारण केले जात आहे.दरम्यान, एकनाथ शिंदे गटानेही उद्या फ्लोर टेस्टसाठी मुंबई गाठण्याचे जाहीर केले आहे.मात्र, त्याआधी सर्व आमदार आज गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबल्याची चर्चा आहे.शेवटच्या प्रसंगी आमदार पोहोचावेत,  अशी यामागची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. 
 
राज्यपालांनी पत्र लिहून 30 जून रोजी सकाळी 11वाजता फ्लोर टेस्टसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याचे आदेश दिले आहेत.विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, 7 अपक्ष आमदारांचे ईमेल आणि विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बहुमत कमी झाल्याचे म्हटले आहे.अशा स्थितीत फ्लोर टेस्ट आवश्यक वाटत असून त्यासाठी 30 जून रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलवावे.एवढेच नाही तर फ्लोअर टेस्टची प्रक्रिया 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.