सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 29 जून 2022 (08:37 IST)

गुवाहाटीतून एकनाथ शिंदेंनी सेनेला दिले हे आव्हान

eknath shinde
शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गुवाहाटीत असताना पहिल्यांदा माध्यमांसमोर आले आहेत. गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन ब्लूच्या गेटवर शिंदे आले असता, माध्यमांनी त्यांना घेरलं. यावेळी शिंदे यांना प्रश्न विचारले असता आमचे प्रवक्ते केसरकर आहेत, याबद्दल ते बोलतील असं त्यांनी सांगितलं. मात्र, गुवाहाटीतील सर्व आमदार आनंदात असून ,ते त्यांच्या इच्छेने इथे आले आहेत. गुवाहाटीतील काही आमदार कोणाच्या संपर्कात असल्याचे दावे खोटे आहेत. असं असेल तर संपर्कात असलेल्या एक-दोन आमदाराचे नावे सांगून दाखवा असं थेट आवाहन यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ते आतापर्यंत त्यांनी माध्यमांशी फक्त फोनद्वारे संवाद साधला होता. मात्र, अद्याप ते उघड उघड कॅमेरासमोर किंवा माध्यमांसमोर आले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या बंडात सामील असलेल्या काही आमदारांचा फोटो शेअर करत शक्तीप्रदर्शन केलं होतं. ‘त्यासोबतच आपल्याला एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे’, असं वक्तव्य केलेला एक व्हिडिओ देखील समोर आला होता.गुवाहाटीतून एकनाथ शिंदेंनी सेनेला दिले हे आव्हान.