सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (15:24 IST)

आम्ही जी बाळासाहेब आणि शिवसेनेची भूमिका आहे ती पुढे घेऊन जात आहोत :एकनाथशिंदे

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबतचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. अनिल देसाई आणि संजय राऊत यांनी शिवसेनेच्या संपर्कात 20 आमदार असल्याचे म्हटले आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तर 15 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. त्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे पलटवार केला आहे.
 
केसरक हे आमची भूमिका स्पष्ट करतील. केसरक आमचे प्रवक्त आहेत. ते तुम्हाला वेळोवेळी माहिती देत आहेत. आम्ही जी बाळासाहेब आणि शिवसेनेची भूमिका आहे ती पुढे घेऊन जात आहोत. आम्ही  शिवसेनेत आहेत. आम्ही शिवसेनेला पुढे घेऊन जात आहोत. आपल्याला जे पुढचे पाऊल असेल त्याची माहिती दिली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

हे सगळे लोक जे आहेत ते आनंदात आहेत. जी माहिती बाहेरून येत आहेत की आमच्या बरोबर एवढे लोक संपर्कात आहेत तेवढे लोक संपर्कात आहेत, कृपया त्यांनी नावे सांगावीत आणि मग स्पष्टता येईल. या मध्ये खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचे काम हे लोक करत आहेत. त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. येथे 50 लोक आहेत. ते 50 लोक स्वताच्या मर्जीने आले आहेत. ते खुश असून आनंदी आहेत. एक भूमिका घेऊन आम्ही आलो आहोत. ते 40 ते 50 लोक स्वत:च्या स्वार्थासाठी आलेले नाहीत. एक हिदूत्वाची भूमीका बाळासाहेबांची भूमीका घेऊन ते आले आहेत. असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले.