1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated: मंगळवार, 28 जून 2022 (15:23 IST)

'या' माजी महापौर यांची शिवेसनेतून हकालपट्टी

shivsena
ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे  यांची शिवेसनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. सत्तासंघर्षाचा  आठवा दिवस असून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. ठाण्यासह आजूबाजूच्या शहारातूनही त्यांना समर्थन वाढत आहे. त्यातच, ठाणे जिल्हासंघटक आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही हकालपट्टी करण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.