शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (09:00 IST)

नव्या सरकारचे फटाके लवकरच फोडू- श्रीकांत शिंदे

eknath shinde
सर्वोच्च न्यायालयाकडून बंडखोर आमदारांना दिलासा मिळाल्यावर ठाण्यात जल्लोष करण्यात आला. एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, 'हा सत्याचा विजय असून शिवसेना संपवण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाने लगावलेली चपराक आहे'.
 
तत्पुर्वी श्रीकांत शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शनही घेतले होते.आता लवकरच नव्या सरकारचे फटाके फोडू आणि तुम्हालाही बोलावू असे सूचक विधान त्यांनी काल केले.