संबंधित माहिती
- LIVE: चेंबूर स्कूल बस अपघातानंतर बीएमसीकडून मोठी कारवाई! तीन अधिकारी निलंबित
- नवी मुंबईत पाणी साचल्याने दोन किशोरवयीन मुलींना विजेचा धक्का बसला; रुग्णालयात दाखल
- मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर पालघर मध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद
- कॅफेमध्ये तोडफोड करत अरेरावी करणे महागात पडले; पुणे पोलिसातील पीएसआय निलंबित
- महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला; मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी
महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा संबंध बिहारशी, सायबर कॅफेवर छापा; ३ जणांना अटक
महाराष्ट्रात २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या अवघ्या २४ तास आधी, या पेपरफुटीचा संबंध बिहारच्या हाजीपूरशीही जोडला गेला आहे. महाराष्ट्र विशेष कृती दलाचे (एसटीएफ) एक पथक हाजीपूरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी सायबर कॅफे'वर एक तासभर छापा टाकला. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणात एक मोठा खुलासा झाला असून, आता याचे धागेदोरे थेट बिहारशी जोडले गेले आहे. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बिहार एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर येथे एक मोठा छापा टाकला. हाजीपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचरी रोडवरील एका प्रसिद्ध सायबर कॅफेवर हा छापा टाकण्यात आला. महाराष्ट्र एसटीएफचे पथक हाजीपूरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी कचरी रोडवरील 'क्विक डिजिटल सायबर कॅफे'वर एक तासभर छापा टाकला.
पहाटे सुमारे १ वाजेपर्यंत चाललेल्या छाप्यानंतर, एसटीएफ पथकाने कॅफे मालक सोनू कुमारसह तीन जणांना ताब्यात घेतले असून, सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. त्याचा संबंध पेपरफुटी प्रकरणाचा सूत्रधार व समस्तीपूरचा रहिवासी असलेल्या बिजेंद्र गुप्ताशी जोडला गेला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र एसटीएफ पथक सोनूचा धाकटा भाऊ विकास याचाही शोध घेत आहे, जो पाटणा येथे सायबर कॅफे चालवतो. छाप्यादरम्यान, महाराष्ट्र एसटीएफ पथकाने अनेक डिजिटल पुरावे जप्त केले असून, त्यांची सखोल तपासणी केली जाईल. महाराष्ट्र एसटीएफ पथकाने अधिक तपशील दिला नसला तरी, त्यांनी सांगितले की हा छापा टेट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर टाकण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्र टीईटीसाठी ४,२८,००० हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती, परंतु २८ जून रोजी होणाऱ्या परीक्षेच्या केवळ २४ तास आधी पेपरफुटी झाली. यानंतर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा रद्द केली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील भिवंडी येथे छापे टाकून बिहार आणि हरियाणातील अनेक आरोपींना अटक केली.
Edited By- Dhanashri Naik
