मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर पालघर मध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद
मुंबईच्या अनेक भागांतील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर परिसरात मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्यात आली आहे.
हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात आज सळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या शक्यतेच्या हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जारी केले आहे. जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचले होते. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ तासांत जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने सर्व आवश्यक खबरदारीचे उपाय योजले असून नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णपणे सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
Edited By- Dhanashri Naik
