संबंधित माहिती
- 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' येथे 3400 वंचित मुलांसाठी 'द साउंड ऑफ म्युझिक' हा विशेष कार्यक्रम
- मान्सून: मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- Ganpati Special Trains रेल्वे 156 गणपती स्पेशल ट्रेन चालवणार, वेळापत्रक तपासा
- आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर १ जुलै रोजी मोर्चा
- संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे आगमन, पुणे वेधशाळेची माहिती
मुंबई-गोवा वंदे भारत आठवड्यातून तीन दिवस धावणार
पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका अधिक असल्यामुळे मुंबई-गोवा वंदे भारत आठवड्यातून तीन दिवसच सेवा देणार आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोकणातल्या वंदे भारतला हिरवा कंदिल दाखवणार आहेत.
सर्वसामान्य वेळापत्रकानुसार वंदे भारत आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. कोकणात अतिवृष्टी होत असते. या काळात दरड कोसळण्याची भीती असते. बहुतांश वेळा दरड कोसळून वाहतूक कोलमडली आहे. रेलवे ठप्प झाली आहे. रेल्वेच्या वेळापत्रकाला फटका बसला आहे. पावसाळ्यात धुकेही पसलेले असते. त्यामुळे वंदे भारतला ताशी ८० च्या वेगाने प्रवास करावा लागणार आहे. कमी वेगामुळे वंदे भारत नियोजित वेळेत मुंबईतून कोकणात पोहचू शकणार नाही. हे सर्व लक्षात घेऊन कोकण वंदे भारताचे तात्पूरते वेळापत्रक तीन दिवसांचे ठेवण्यात आले आहे.
मुंबई कोकण वंदे भारतचे नियोजित वेळापत्रक सहा दिवसांचे असणार आहे. केवळ शुक्रवारी कोकणातल्या वंदे भारतला सुट्टी असेल. तर पावसाळ्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी वंदे भारत कोकणात सेवा देईल. वंदे भारत ही या तीन दिवसांना सीएएमटीवरून सकाळी ५.३२ वाजता सुटेल तर १० तासांनी ती मडगावला दुपारी साडेतीनला पोहोचणार आहे. गोव्यावरून परतीच्या प्रवासाला निघताना वंदे भारत ही आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुटणार आहे. मडगावहून ही ट्रेन दुपारी १२.२० वाजता सुटणार आहे. तर सीएमएमटीला ही ट्रेन रात्री १०.२५ वाजता पोहोचणार आहे. पावसाळ्यात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वंदे भारतला दहा तास लागणार आहेत. अन्य दिवशी हेच अंतर साडेसात तासांत पूर्ण होणार आहे.
पुढील लेख
