1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. murder by police in parbhani

रक्षक झाला भक्षक, पोलिसाने भोसकले आठ नागरिकांना

परभणी: पोलिसाने आठ नागरिकांना चाकूने भोसकले
राग आला तर माणूस कोणत्या थराला जाईल आणि आपला राग व्यक्त करेल हे बिल्कुल सांगता येणार नाही.असाच काहीसा प्रकार परभणी थे घडला असून, ज्या पोलिसांकडे आपण दाद मागतो त्याच एका  माथेफिरू पोलिसाने आठ नागरिकांना चाकूने भोसकले आहे. परभणी शहरातील धनूबाई प्लॉट परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे . जखमींमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.
 
सविस्तर वृत्त असे की ,  धनूबाई प्लॉट परिसरात कोपऱ्यावर  मुलं उभी होती. तुम्ही माझ्याकडेच का बघताय, असं विचारले आणि  पोलिस कर्मचारी अंजना रास्कटलाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हस्तक्षेप करणाऱ्यालाही पोलिस कर्मचाऱ्याने  बेदम  मारहाण केली. प्रकरण अधिक गंभीर होत असल्याचे लक्षात आल्याने आजूबाजूच्या लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्याने चाकू काढत लोकांवर वार करायला सुरुवात केली. यामध्ये  ८ नागरिक  जखमी झाले.जखमींना परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.तर पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली आहे.
पुढील लेख
चीन: दुकानदाराने केली उंदराला अमानुष शिक्षा