रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

चीन: दुकानदाराने केली उंदराला अमानुष शिक्षा

सगळ्या प्रकारचे प्राणी खाणारा देश म्हणून आधीच चीन जगात बदनाम आहे. त्यात एका माथेफिरू दुकानदाराने तर हद्दच केली आहे. धान्याची विक्री करणाऱ्या दुकानदाराने आपल्या गोदामातील धान्य पळवणाऱ्या एका उंदराला पकडून त्याला चक्‍कं शिक्षा केली आहे. यावरून जगात किती मुर्ख लोक आहेत याची प्रचिती येते. यावरून सोशल मिडीयावर प्राणीप्रेमी चिडले असून या प्रकारे कोण वागतो एका असा प्रश्न ते उभा करत असून चीनवर मोठ्या प्रमाणत टीका केली आहे.
गोदामातील धान्य उंदिर सतत पळवत आहे असे समजल्यावर हा दुकानदार आधीच वैतागला होता. त्यातून तो धान्य पळवणारा उंदिर एक दिवस त्याच्या तावडीत सापडला. यावर या चिडलेल्या दुकानदाराने या उंदराला शिक्षा करण्याचे ठरवले. उंदराचे चारही पाय एका दोरीने बांधले आणि एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा करताना बांधावे तसे त्याला बांधून ठेवले. यावरून तो उंदिर जीवाच्या आकांताने ओरडू लागला परंतु या दुकानदाराला त्याची जराही दया आली नाही. त्या उंदराला केवळ बांधूनच हा दुकानदार थांबला नाही तर त्याने त्या उंदराच्या गळ्यात एक पाटीही टांगली. या अमानुषपणे छळाला तो उंदीर मरण पावला तर ही पोस्ट फोटोसह सोशल मिडीयावर व्हायरल झाली आणि चीन टीकेचा धनी झाला आहे. या प्रकारचे वृत्त जगप्रसिद्ध इंग्रजी वृत्त सेवा सी एन एन  ने दिली आहे.