मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 (21:48 IST)

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहे. महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहे. पण, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाबाबत आतापर्यंत सस्पेंस कायम आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नेता निवडण्यासाठी महायुतीच्या सातत्याने बैठका सुरू आहे.महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? यावर आज निर्णय होऊ शकतो. तसेच एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेऊ शकतात. असे संकेत शिवसेना शिंदे नेते संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी दिले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
 

एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी जातात. येत्या 2 दिवसांत आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबाबत निर्णय घेणार असून औपचारिकतेनंतर नवीन सरकार स्थापन केले जाईल, असे भाजपने सांगितले आहे. सविस्तर वाचा 
 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन 6 दिवस झाले आहे, पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजून काहीही निश्चित झालेले नाही. मुख्यमंत्रिपदासाठी नेता निवडण्यासाठी महायुतीच्या सातत्याने बैठका सुरू आहे. सविस्तर वाचा 
 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल येऊन एक आठवडा झाला आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील सस्पेंस संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्लीतील महाआघाडीच्या बैठकीनंतर मुंबईत होणारी बैठक रद्द करण्यात आली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी भाजप हायकमांड अन्य कुणा भाजप नेत्याला मुख्यमंत्री बनवू शकते, अशा बातम्या समोर येऊ लागल्या. आता या यादीत मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचाही समावेश आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर आपले मौन सोडले आहे. सविस्तर वाचा

यवतमाळ जिल्ह्यात सेतू केंद्र चालकांकडून ग्राहकांकडून जादा दर आकारला जात आहे.या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा कार्यालयाने अभिप्राय कक्ष तयार केला आहे. तसेच या कक्षाकडे दररोज असंख्य तक्रारी येत आहे. या गंभीर तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने 104 सेतू केंद्र चालकांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे. सविस्तर वाचा 

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये एसीबीने छापा टाकून लाच घेणाऱ्या पोलिसांना रंगेहाथ पकडले आहे. गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागताना एसीबीच्या पथकाने शहरातील फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या दोन शिपायांना पकडले. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा 
 

रविवारी मुंबईतील तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या मेगाब्लॉकमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण, पश्चिम रेल्वेवर दिवसभरात मेगाब्लॉक नाही. सविस्तर वाचा 
 

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या 'कुत्रा' टिप्पणीवर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, "मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. सविस्तर माहिती 

महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करायची याबाबत संभ्रम कायम आहे. मुख्यमंत्र्यांसाठी महायुतीमध्ये आत्तापर्यंत अनेक बैठका झाल्या, त्यापैकी कोणताही निकाल लागलेला नाही. सविस्तर वाचा 

काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही निवडणूक आयोगाला कुत्रा म्हणत अवमान केला आहे. भाई जगताप यांच्या या वक्तव्याला भाजपने विरोध केला आहे. यावर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही विरोधकांवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा 

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे, असे मत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी शनिवारी व्यक्त केले. सविस्तर वाचा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत हेराफेरीचा झाल्याचा आरोप शनिवारी केला. महाराष्ट्रात संपूर्ण निवडणूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग झाला, जो याआधी कोणत्याही विधानसभा किंवा राष्ट्रीय निवडणुकीत कधीही दिसला नव्हता, असे देखील ते म्हणाले. सविस्तर वाचा 

महाराष्ट्रात अद्याप मुख्यमंत्री कोण होणार या वर सस्पेन्स आहे. आता महाराष्टार्त नवीन सरकार स्थापनेवरून महायुतीमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पाश्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने गृहमंत्रालय कडे आपली पहिली मागणी केली आहे.सविस्तर वाचा ... 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीने निर्णायक विजय मिळवला आहे. महायुती आता सरकार स्थापनेच्या तयारीत व्यस्त आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच इतर मंत्रिपदांसाठीही नावांची निवड होणे बाकी आहे.सविस्तर वाचा ...

महाराष्ट्रातील नवे मुख्यमंत्री आणि सरकार स्थापनेबाबत सातत्याने साशंकता आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कधी होणार? याबाबतही जोरदार चर्चा  सुरू आहे. सविस्तर वाचा ... 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पारदर्शकता नसल्याचा दावा करत काँग्रेसचे महाराष्ट्र विभाग प्रमुख नाना पटोले यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेच्या शंका दूर करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सविस्तर वाचा ...

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मोठी बातमी येत आहे. वास्तविक, कार्यवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली आहे.सविस्तर वाचा ....