बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 (15:01 IST)

आम्हाला गृहमंत्रालय मिळावे', शिवसेनेने आपली मागणी मांडली

sanjay shirsat
महाराष्ट्रात अद्याप मुख्यमंत्री कोण होणार या वर सस्पेन्स आहे. आता महाराष्टार्त नवीन सरकार स्थापनेवरून महायुतीमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पाश्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने गृहमंत्रालय कडे आपली पहिली मागणी केली आहे.

शिवनेला नव्या सरकार मध्ये गृहखाते मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.असे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले. गृहखाते हे उपमुख्यमंत्र्यांकडे असते. 
मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असणे हे योग्य ठरणार नाही. 

शिंदे हे आघाडी सरकारचा चेहरा बनल्याने भाजपला फायदा झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलकांना शांत करण्यात शिंदे यांनी भाग घेतला आणि जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि मराठांना आरक्षण दिले. मराठवाड्यात सर्वाधिक सभा एकनाथ शिंदे यांनी घेतल्या आहे असे शिरसाट म्हणाले. 

शिंदे मुंबईतील महायुतीची बैठक रद्द करून थेट दिल्लीतून त्यांचे गावी साताऱ्यात निघून गेले. ते युतीतील मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेल्या गतिविधींमुळे नाराज असल्याची चर्चा होती. असे असतांना ते गावी निघून गेल्याची चर्चा सुरु असताना शिवसेनेच्या नेत्याने हे दावे फेटाळून लावले आणि पक्षप्रमुखांना अस्वस्थता जाणवत असल्याचे सांगितले. सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवारी बैठक होण्याची शक्यता असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. 

शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मिळून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावे, असा संदेश दिल्याचे उदय सामंत यांनी शुक्रवारी सांगितले होते. सामंत म्हणाले, एकनाथशिंदे सरकारमध्ये असणे महत्त्वाचे आहे. कारण लाडकी बहीण योजना त्यांनीच सुरु केली .
 
शिंदे यांची सकारात्मक प्रतिमा आणि त्यांनी सुरू केलेल्या योजना पाहता, त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले असते तर अधिक योगदान दिले असते, असे म्हणता येईल.

सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवारी बैठक होण्याची शक्यता असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार असून, त्यात मंत्रिमंडळाच्या रचनेवर सविस्तर चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे स्वतः निर्णय घेतील. असे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit