बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 (11:00 IST)

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये एसीबीचा छापा, दोन पोलिसांना अटक

Bribe
Amravati News: अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये एसीबीने छापा टाकून लाच घेणाऱ्या पोलिसांना रंगेहाथ पकडले आहे. गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागताना एसीबीच्या पथकाने शहरातील फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या दोन शिपायांना पकडले. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने 15 ऑक्टोबर रोजी एसीबी कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचला होता. व सतीश सुभाष सावरकर 39 आणि अनिरुद्ध नामदेवराव भीमकर 33 दोन्ही शिपायांना ताब्यात घेण्यात आले.
तसेच ही कारवाई एसीबीचे अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन शिंदे, उपअधीक्षक अभय आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश दंडे, चेतन मांढरे, आशिष जांभुळे, प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, उंड्रा थोरात, चंद्रकांत जनबंधू यांच्या पथकाने केली.  

Edited By- Dhanashri Naik