संबंधित माहिती
- राज्यात ८ हजार १४२ नवे कोरोनाबाधित दाखल
- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सावध प्रतिक्रिया
- राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा : सदाभाऊ खोत
- दिलासा, राज्यातील आपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार
- पंतप्रधान-किसान योजनेंतर्गत 47 लाखाहून अधिक शेतकर्यांतचे देयके रोखले, कारण काय आहे ते जाणून घ्या
सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार
सीबीआयला यापुढे महाराष्ट्रातील तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याच्या गृहविभागाने नुकताच याबाबत मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे यापुढे सीबीआय राज्य सरकारच्या परवानगी शिवाय कोणताही तपास आपल्या हाती घेऊ शकत नाहीत हे स्पष्ट झालंय.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयने स्वत:कडे घेतला. यामध्ये मुंबई पोलिसांची खूप बदनामी झाली. तसेच टीआरपी घोटाळ्याची चौकशी सीबीआय स्वत:कडं घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेल्याचं समजतंय.
टीआरपी घोटाळ्याचा तपास मुंबई पोलीस करतायत यासंदर्भात यूपीमध्ये तक्रार दाखल झालीय. यासंदर्भात यूपी पोलिसांनी केलेली चौकशीची विनंती सीबीआयने तात्काळ मान्य केली. आणि सीबीआयने तपास आपल्याकडे घेतला. त्याच पद्धतीने मुंबईतील टीआरपी घोटाळ्याची चौकशी सीबीआय स्वत:कडे घेण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे.
