संबंधित माहिती
- कोल्हापुरात ऊसतोडणी ठेकेदाराची हत्या
- सरकारकडून प्रवीण दरेकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, चंद्रकांत पाटील यांचा आरोप
- आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यास आम्ही ५ वर्ष मोफत वीज देऊ : बावनकुळे
- वडापाव महागला, दर 5 ते 7 रुपयांनी वाढून 20 रुपयांवर पोहोचले
- खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी कारभाराला चाप लावणार का? परिवहन मंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर
एकाच माणसाला 500 वेळा साप चावला, आता डॉक्टर म्हणतात..
लातूर (Latur)जिल्ह्यातिल औसा येथे एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या गावात एक अशी व्यक्ती आहे ज्याला आतापर्यंत एक दोन वेळा नाही तर तब्बल 500 पेक्षा जास्त वेळ सापाने चावा घेतलाय. कदाचित या गोष्टीवर सामान्यांचा विश्वास बसणार नाही, पण खरी घटना आहे. लातुरच्या औसा शहरातील रहिवासी 45 वर्षीय अनिल तुकाराम गायकवाड शेतमजुरी करत आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. अनिलला गेल्या 10 ते 15 वर्षांत किमान 500 वेळा साप चावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनिलला अनेकवेळा आयसीयूमध्येही दाखल करण्यात आले आहे. इतक्या वेळा साप चावूनही हा अनिल आयुष्याच्या या शर्यतीत जोमाने टिकून आहे.
डॉ.सच्चिदानंद रणदिवे यांनी आतापर्यंत किमान 150 वेळा अनिल गायकवाड यांच्यावर उपचार केले आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अनिल यांनाच साप का चावतो याच मोठं आश्चर्य वाटतं. एकाच व्यक्तीला अनेकवेळा सर्पदंश होतो, ही खरोखरच आश्चर्यकारक घटना आहे.
