शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (15:14 IST)

वडापाव महागला, दर 5 ते 7 रुपयांनी वाढून 20 रुपयांवर पोहोचले

Vadapav became more expensive
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असेलला आणि  गरिबांची पोटपूजा, मध्यमवर्गीयांचे फावल्या वेळेतील उदरभरण आणि श्रीमंतांसाठी चवीचे खाणे असलेला वडापाव आता चक्क 20 रुपयांवर पोहोचलाय. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तसंच सिलिंडरच्या दरातही वाढ झाली असून त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवर झालाय. वडापावचे दर 5 ते 7 रुपयांनी वाढवण्यात आलेत.
 
मुंबईकरांचं लोकप्रिय फास्ट फूड असलेला वडापाव लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानाच जवळचा वाटता. खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळालेला वडापाव हातगाडीपासून थेट पंचतारांकित हॉटेलांच्या चकचकीत टेबलांवर पोहोचला आहे.
 
दोन-तीन रुपये किमतीपासून सुरु झालेला वडापावचा प्रवास 20 रुपयांपार्यंत पोहचला आहे. वडापाव मिळत नाही.  तेल आणि गॅसच्या दरात झालेल्या वाढीने सर्वसामान्यांचा वडापाव महागला आहे.