रविवार, 14 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (12:45 IST)

नारायण राणे पितापुत्रांना मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

Great relief to Narayan Rane's father and son; Bail granted नारायण राणे पितापुत्रांना मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर Marathi Regional News In Webdunia Marathi
दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली होती. त्यांनी दिशा सालियन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र हा आरोप खोटा असल्याचे दिशाच्या आईने सांगून राणे यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या प्रकरणात राणे पिता पुत्रांची सलग  8तास चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात अमित शाह यांच्याशी फोनवरून बोलण्याचा दावा राणेंनी केला होता. त्यामुळे त्यांना सोडण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले होते. हे खोटे ठरले त्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल का ? अशी चर्चा सुरु होती. आता  नारायण राणे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्यांचा  अटकेपूर्व जामीन काही अटी आणि शर्त वर मंजूर करण्यात आला आहे.  दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्यायमूर्तीनी हा निर्णय दिला आहे.