1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (10:46 IST)

'आई-बाप काढू नका' सुप्रिया सुळेंनी सुनावलं केंद्रीय मंत्र्यांना

Supriya Sule told Union Ministers not to remove parents 'आई-बाप काढू नका' सुप्रिया सुळेंनी सुनावलं केंद्रीय मंत्र्यांनाMarathi Regional News In Webdunia Marathi
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला.
'पहिल्या सरकारने 60 वर्षांत काय केलं हा डायलॉग जुना झाला, केवळ कलम 370 काढल्याने काश्मिरी नागरिकांच्या आयुष्यात बदल घडत नाही. 2022-23च्या अर्थसंकल्पात भाजप सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली?' असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. जम्मू-काश्मिरमधल्या शिक्षणव्यवस्थेबद्दल भाष्य केल्यानंतर त्यांच्यात आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात वाद घातला.
 
मागच्या सरकारला दोष देण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा सुप्रिया सुळेंचा पवित्रा होता.
 
या चर्चेदरम्यान 'तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इथे पोहोचलात' असं विधान जितेंद्र सिंह यांनी केलं.
यावर 'डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालेला तुम्हाला चालतो, मग आमच्याबद्दल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? फादर - मदर को छोड के कुछ भी बोल सकते है, माँ-बाप मत निकालिए' असं सुप्रिया सुळेंनी लोकसभेत जितेंद्र सिंह यांना सुनावले.