माजी मंत्री शंकर राव कोल्हे यांचे निधन
माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शंकर राव कोल्हे यांचे त्यांच्या कोपरगाव येथील राहत्याघरी वृध्दापकाळाने निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी कोपरगाव तालुक्यात सहकारी आणि शिक्षण संस्थांचं जाळं निर्माण केले. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षांपासून सरपंच म्हणून राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.