भरधाव वेगाने कार बाजूने घेऊन गेल्याचा राग; गावगुंडांचा तरूणावर तलवारीने जीवघेणा हल्ला
किरकोळ वादातून एका २५ वर्षीय तरुणावर भर रस्त्यातच गावगुंडांनी गाठून चॉपर आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहेत. या घटनेत अमोल माने (वय २५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सूरू आहेत. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
भिवंडी शहरात अमोल भरधाव वेगाने आपले चारचाकी घेऊन जात होता. आरोपींच्या जवळून भरधाव वेगाने कार घेऊन कसा जातो. याच गोष्टीचा राग मनात धरला होता. याच रागाच्या भरात चरणी पाडा परिसरात गाव गुंडाने अमोल माने याच्यावर भर रस्त्यात चॉपर, तलवारी व लोखंडी रॉडने अचानक जीवघेणा हल्ला केला. अमोलवर हल्ला केल्याचे पाहून अमोलचे वडील व त्यांचे भाऊ हे त्याला वाचविण्यासाठी आले होते. मात्र त्यांनाही या गावगुंडाने जखमी केले आहे.
विशेष म्हणजे हल्ल्याचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून तो व्हिडिओ (CCTV Video) व्हायरल केला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात हल्लेखोरा विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. गेनू बांगारे ,मनोज बांगारे, गोपी गिरी, अमित रायत असे अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.