मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (12:24 IST)

होळी -रंगपंचमीसाठी राज्यसरकारची नियमावली

Rules of State Government for Holi-Rangpanchamiहोळी -रंगपंचमीसाठी राज्यसरकारची नियमावली Marathi Regional news In Webdunia Marathi
कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. राज्यात कोरोनासाठी लावण्यात आलेले निर्बंध देखील कमी करण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सर्व सण कोरोनाच्या सावटाखालीच गेले आहे. पण आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे यंदा नागरिकांना होळीचा सण साजरा करता येईल.यांचा होळी 17 मार्च रोजी आणि धुळवड 18 मार्च रोजी साजरी होणार आहे. पण होळी धुळवड साजरी करण्यासाठी राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांनी त्याचे पालन करूनच होळीचा सण साजरा करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. 
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील सुरु आहेत. त्यामुळे नवीन नियमावलीनुसार होळीला डीजे लावण्यास बंदी आहे. तसेच होळी रात्री 10 वाजे नंतर साजरी करण्यास बंदी आहे. मद्यपान करून होळी साजरी करू नये. रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे वापरण्यास बंदी आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेऊन कोणतीही घोषणा करू नये. अशी नियमावली राज्य सरकारने जाहीर केली आहे