सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (15:07 IST)

द काश्मीर फाइल्स चे पंतप्रधान मोदी हे सर्वांत मोठे प्रचारक : संजय राऊत

द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केल्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे प्रचारक असून, भाजपवाले राजकीय अजेंडा रावबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला आहे.
 
द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे पंतप्रधान मोदी हे सर्वांत मोठे प्रचारक आहेत. हा एक राजकीय अजेंडा राबवला जात आहे. काश्मिरी पंडितांची वेदना देशात बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकी कुणाला माहीत नसेल, असे सांगत द काश्मीर फाइल्समध्ये अनेक सत्य दडवली आहेत. ताश्कंद फाइल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता. तसाच अजेंडा काश्मीर फाइल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाइल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसता चित्रपट टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.