गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (14:43 IST)

पोलिसांच्या अब्रुची लक्तरं वेशीवर, पोलीस चौकीतच मद्य पार्टी

नाशिकमध्ये गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगर परिसरातील पोलीस चौकीतच 5 पोलीस मद्यधुंग अवस्थेत पार्टी करीत असताना रंगे हात नागरिकांना सापडले आहेत. आपल्या परिसरातील प्रेमी युगुलांचे चाळे सुरू असल्याने त्यासंबधी तक्रार देण्यासाठी परिसरातील नागरिक तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेले होते. तेथे मद्याच्या पार्टीत रंगलेले पोलीस त्यांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी त्यांना जाब विचारला.
 
धक्कादायक म्हणजे पार्टीत रंगलेल्या पोलिसांनी त्या नागरिकांनाच मारहाण सुरू केली. त्यामुळे नागरिकांचा मोठा जमाव पोलीस चौकी परिसरात जमयला सुरूवात झाली. पोलिसांच्या डर्टी पार्टीचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने. रात्री सव्वा दहाच्या सुमारास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस चौकीत भेट दिली. आणि नागरिकांना घडलेल्या प्रकरणाबाबत कारवाईचे आश्वासन दिले.