मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (15:32 IST)

सरकारकडून प्रवीण दरेकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

राज्य सरकारकडून प्रवीण दरेकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, प्रवीण दरेकरांवर जर अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात येत असेल तर त्याची मी यादी तयार केली आहे. गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये १०३ जणांवर गुन्हे दाखल करावे लागतील. त्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ९० जणांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे आज आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यावर यश मिळवतो, त्यामुळे गृहमंत्र्यांनी देखील टीका केली आहे. तसेच आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राऊतांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये जी काही कामं केली त्यावर चौकशी करावी. याबाबत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
तुमचं सरकार येऊन २७ ते २८ महिने पूर्ण झाले आहे. तरीदेखील तुम्ही रोज धमक्याच देत आहात. नवाब मलिकांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. कॅबिनेट मंत्र्यांना जेलमध्ये राहून २० दिवस झाले असले तरी देखील तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाही आहात. काल हाय कोर्टाने मलिकांचा जामीन नाकारला. जर तुम्हाला त्यांचा राजीनामा घ्यायचा नसेल आणि जर दाऊदचा दबाव असेल तर त्यांचं खातं तरी काढून घेऊ शकता, असं पाटील म्हणाले.