विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आजपासून शाळा सुरु होणार
महाराष्ट्रात आज १५ जून २०२६ पासून बहुतेक शाळा सुरू होत आहे. उर्वरित महाराष्ट्र विदर्भ वगळता प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये आज १५ जून २०२६ पासून ऑफलाइन नियमित वेळेत सुरू होत आहे. प्रत्यक्ष हजेरी अनिवार्य आहे, कोणतेही ऑनलाइन वर्ग नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवार, १५ जून २०२६ पासून विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यासाठी 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके आणि गणवेश वाटप केले जात आहे.
मात्र, शाळा सुरू होण्याबाबत राज्यामध्ये दोन महत्त्वाचे बदल आहे, जे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे
विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू होणार: विदर्भातील कडक उन्हाळा आणि वाढते तापमान लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील शाळा ३० जून २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे विदर्भातील शाळा १ जुलैपासून नियमित वेळेत सुरू होतील.
उर्वरित महाराष्ट्र: मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शाळा आज म्हणजेच १५ जूनपासून नियमित वेळेत सुरू झाल्या आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: दोन बहिणींवर बलात्कार करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी भरूच येथून आरोपीला ठोकल्या बेड्या
मात्र, शाळा सुरू होण्याबाबत राज्यामध्ये दोन महत्त्वाचे बदल आहे, जे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे
विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू होणार: विदर्भातील कडक उन्हाळा आणि वाढते तापमान लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील शाळा ३० जून २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे विदर्भातील शाळा १ जुलैपासून नियमित वेळेत सुरू होतील.
ALSO READ: अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारकडून १४.५८ कोटी मंजूर
तसेच शाळा प्रवेशोत्सव २०२६ साजरा होणार असून, पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळेशी संपर्क साधावा. उष्णतेमुळे काही ठिकाणी सावधानी बाळगण्याचे आवाहन आहे.Edited By- Dhanashri Naik