1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Siya fell in love with Chetan even after her marriage was fixed plot to commit murder in a café

लग्न ठरल्यानंतरही चेतनच्या प्रेमात पडली सिया, २००४ कॉल्स, पासपोर्ट फाडणे आणि कॅफेमध्ये हत्येचा कट

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सुरुवातीला लोहगड किल्ल्यावरील ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे एक धक्कादायक आणि तितकाच भयानक कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
 
व्यावसायिक केतन अग्रवाल (वय २६) यांचा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सिया गोयल (वय २०) हिच्यासोबत साखरपुडा झाला होता. नोव्हेंबर महिन्यात जयपूरमधील एका मोठ्या महालात (पॅलेस) त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार होता.
 
दिवाळीत चेतनच्या प्रेमात पडली: चौकशीदरम्यान पोलिसांना समजले की, सिया आणि चेतन यांची पहिली भेट २०२५ मधील दिवाळीच्या काळात एका पार्टीत झाली होती. तिथेच त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि कालांतराने त्याचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, सियाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न केतनशी आधीच ठरवले होते आणि सियानेही या लग्नाला संमती दिली होती.
 
चेतनची नाराजी पाहून सियाने तो पासपोर्ट फाडून टाकला:  पोलिसांच्या चौकशीदरम्यान सिया आणि चेतन यांनी सांगितले की, सिया आणि केतन यांनी 'प्री-वेडिंग शूट'साठी बालीला जाणे चेतनला पसंत नव्हते. चेतनची नाराजी पाहून सियाने केतनचा पासपोर्ट फाडून टाकला. विमानतळावर पोहोचल्यावर केतनला आपला पासपोर्ट गहाळ झाल्याचे समजले आणि त्याला बालीची सहल रद्द करावी लागली.
 
कॅफेमध्ये हत्येचा कट आणि अयशस्वी प्रयत्न: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि तिचा प्रेमी चेतन चौधरी यांनी एका कॅफेमध्ये बसून केतनच्या हत्येचा संपूर्ण कट रचला. केतनला मारण्यासाठी त्यांनी गेल्या २५ दिवसांत तब्बल तीन ते चार वेळा प्रयत्न केले होते. १४ जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र केतनने वेळीच एका झाडाचे झुडूप पकडल्यामुळे तो वाचला. त्यावेळी सियाने "तिथे साप होता आणि ती केतनला वाचवत होती" असे सांगून बनाव रचला होता. 
 
सिया आणि चेतन यांच्यात २,००४ वेळा फोनवर संपर्क आणि २३८ तासांचे संभाषणलोहागड किल्ल्यावरील दरीत ढकलून आपला होणारा पती केतन अग्रवाल याची हत्या केल्याचा आरोप असलेली सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे गेल्या सहा महिन्यांत सतत एकमेकांच्या संपर्कात होते. या दोघांनी एकमेकांना २,००४ वेळा फोन केले होते आणि त्यांच्यात एकूण २३८ तास संभाषण झाले होते.
 
१८ जून रोजी अखेर हत्या: शेवटी १८ जून रोजी, सियाने पुन्हा एकदा केतनला लोहगड किल्ल्यावर येण्यास प्रवृत्त केले. यावेळी तिचा प्रेमी चेतन चौधरी हा देखील तिथे एका हुडी घालून चेहरा लपवून त्यांच्या पाळतीवर होता. किल्ल्यावरील एका निर्जन आणि खोल दरीच्या ठिकाणी योग्य संधी साधून सिया आणि चेतनने मिळून केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
 
पोलिसांनी असा केला पर्दाफाश: घटनेनंतर सियाने रडून "केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला" असा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी जेव्हा लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले, तेव्हा त्यांना ३३ अंश सेल्सिअस एवढ्या कडक उन्हात एक तरुण हुडी घालून, चेहरा पूर्णपणे लपवून आणि डोक्यावर हेडफोन लावून फिरताना दिसला. या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी तपास तीव्र केला. तांत्रिक पुरावे आणि कॉल रेकॉर्ड्स (CDR) तपासल्यानंतर पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली असून, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. केतनच्या पालकांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.  
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
Renault Kiger चे नवीन व्हेरिएंट्स भारतात लाँच: शक्तिशाली इंजिन, किंमती आणि वैशिष्ट्ये