1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Supreme Court rejects Valmik Karad's bail application

वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या  निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज  सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. या पूर्वी देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.
वाल्मिक कराड यांनी बीड जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोषमुक्ती व जामिनचा अर्ज दाखल केला होता मात्र दोन्ही न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासात समोर आलेले पुरावे लक्षात घेता. 
त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु तेथेही त्याचा अर्ज फेटाळण्यात
 सर्वोच्च न्यायालयाने सध्या जामीन नाकारला असला तरी भविष्यात पुन्हा अर्ज करण्याची मुभा ठेवली आहे. मात्र, खटल्याची सुनावणी दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यासच सुमारे एका वर्षानंतर तो पुन्हा न्यायालयात अर्ज करू शकतो. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी 19 फेब्रुवारीरोजी झाली होती.
संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. देशमुख कुटुंबीयांच्या मते, ही घटना खंडणीच्या वादातून घडली. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. सुरुवातीला पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले; मात्र आंदोलन आणि मोर्चांनंतर तपासाला वेग आला आणि आरोपींना अटक करण्यात आली.
 
या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दावा केला आहे की, आंधळे तीन वेळा आपल्या गावी येऊन गेला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी सीआयडीला दिल्याचे सांगितले. मोबाईलचा वापर टाळत असल्याने त्याचा माग काढणे कठीण जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे अधिक प्रभावीपणे वापरावे, अशी मागणीही त्यांनी केली
Edited By - Priya Dixit
पुढील लेख
IND vs ZIM: भारताने झिम्बाब्वेचा 72 धावांनी पराभव केला