1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Turtle conservation campaign on Konkan coast successful

चिमुकल्या पावलांचा महासागराकडे प्रवास! कोकणात 'ऑलिव्ह रिडले' कासव संवर्धन मोहीम फळाला

Turtle
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर कासव संवर्धन मोहीम यशस्वी झाली आहे. कोकण किनारपट्टीवर 'ऑलिव्ह रिडले' कासवांच्या संवर्धनाला मोठे यश आले आहे. या मोहिमेअंतर्गत तब्बल १ लाखाहून अधिक कासवांच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले  कासवांच्या संवर्धन मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. तसेच ही मोहीम रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ५६ समुद्रकिनाऱ्यावर राबवण्यात आली, या हंगामात १ लाख ८ हजारांहून अधिक कासवांच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले आहे. यामध्ये वन विभाग, कासव मित्र, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभाग होता व यांच्या प्रयत्नाने ही मोहीम यशस्वी झाली. ही मोहीम गेल्या २२ वर्षांहून अधिक काळ चालू आहे आणि दरवर्षी हजारो पिल्लांना नवजीवन मिळते.
माहितीनुसार ऑलिव्ह रिडले कासवांची प्रजाती आहे. अंडी घालण्यासाठी ते कोकणाच्या किनाऱ्यावर येतात, कुत्री, पक्षी, पूर आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे पिल्लांचे जीवित नुकसान होते. त्यामुळे कृत्रिम घरट्यांमध्ये अंडी संरक्षित करून उबवण आणि पिल्ले सोडणे हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. हे कोकणातील पर्यावरण संरक्षणासाठी ही एक उत्तम उदाहरण आहे. तसेच या चालू हंगामात कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील ५६ समुद्रकिनाऱ्यांवरून तब्बल १ लाख ८ हजार ५९६ कासवांच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले आहे. वनविभागाचा एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी अजूनही अत्यंत अनुकूल आहे, हे या हंगामात सिद्ध झाले आहे. 
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा