संबंधित माहिती
- नागपंचमीला कालसर्पदोषाच्या मुक्तीसाठी वाचा ही पवित्र प्रार्थना....
- शिवलिंगापासून औषध आणि सोनं बनविण्याचे गूढ काय खरं आहेत ...?
- शनी प्रदोष व्रत : शनी प्रदोषाच्या उपवासाचे महत्त्व जाणून घेऊ या आणि हे 10 सोपे उपाय करून बघा ....
- भगवान शंकराच्या गळ्यात गुंडाळलेल्या 10 नागांचे गुपित जाणून घेऊ या ....
- नाग पंचमी 2020 : जाणून घेऊ या शुभ मुहूर्त, मंत्र आणि कथा..
श्री जिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा ।
गृहांत स्थापूनि करुं पूजना ।
आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।
अक्षता घेऊनि कहाणी सांगू या ॥ १ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।
सुवासिनींना भोजन देऊ ।
चणे हळददीकुंकू दूधही देऊं ।
जमुनि आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
सटवीची बाधा होई बाळांना ।
सोडवी तींतून तूंचि तयांना मातां ।
यासाठी तुजला करिती प्रार्थना ।
पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
वंशाचा वेल वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
