गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : शनिवार, 25 जुलै 2020 (15:00 IST)

नाग पंचमी 2020 : जाणून घेऊ या शुभ मुहूर्त, मंत्र आणि कथा..

ज्या लोकांसाठी राहू आणि केतू त्रासदायक आहे किंवा ज्यांना राहूची महादशा सुरू आहे, त्या लोकांनी जर नागपंचमीची पूजा केली तर त्यांना सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यास मदत मिळते. 
पंचमीचा शुभ मुहूर्त -
 
श्रावणातील शुक्लपक्षाची पंचमीला नागदेवांच्या पूजेची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे.
नागपंचमी 2020 : 25 जुलै
पूजेचे मुहूर्त :   5.43 ते 8.25 (25 जुलै 2020)
पंचमी तिथी प्रारंभ :  14.33 (24 जुलै 2020)
पंचमी तिथी समाप्ती : 12.01 (25 जुलै 2020)
 
1. नाग जेथे देवाधिदेव शंकराच्या गळ्यातील हार आहे, तेथे विष्णूंची शैय्या देखील आहे. श्रावण महिन्यातील आराध्यदेव शंकर मानले गेले आहे, हीच वेळ मेघसरींची देखील असते असे म्हणतात की जमिनीतून नाग बाहेर पडतात. ते कोणास हानी देऊ नये यासाठी नाग देवांना प्रसन्न करून नागपंचमीची पूजा केली जाते.
2. नागपंचमी, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी शनिवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कालसर्प योगाची शांती करण्यासाठी पूजा देखील करण्याचे शास्त्रात महत्त्व आहे. नागांना आपल्या गळ्यात आणि जटेमध्ये धारण करण्याच्या कारणास्तव शंकराला काळाचे देव म्हणतात.
3. अमृत बरोबरच नवरत्नांच्या प्राप्तीसाठी देव-दानवाने समुद्र मंथन केले असताना जगाच्या कल्याणासाठी वासुकी नागाने मंथनाच्या वेळी दोऱ्याची भूमिका बजावली. हिंदू धर्मामध्ये नागदेवांची स्वतःची एक वेगळीच जागा आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी नाग जातीचा जन्म झाला होता.
4. महाभारताच्या एका कथेनुसार जेव्हा महाराज परीक्षिताला त्यांचा मुलगा जन्मेजय तक्षक नागाच्या दंशाने देखील वाचू शकला नाही तेव्हा जन्मेजयाने एक मोठं सर्पयज्ञ करून त्या यज्ञाग्नीत भस्मसात होण्यासाठी तक्षकाला येण्यास भाग पाडले.
 
नागपंचमी बद्दल अनेक कथा आहेत. या दिवशी ऐकली आणि सांगितली जाणारी गोष्ट खालील प्रमाणे आहे -
 
एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी एक शेठ राहत असे. त्यांना 7 मुले होती. त्या सातही मुलांचे लग्न झालेले होते. सर्वात लहान मुलाची बायको चारित्र्यवान, हुशार आणि चांगल्या स्वभावाची होती. पण तिला भाऊ नसे.
 
एके दिवशी मोठ्या सुनेने घराला सरविण्यासाठी पिवळी माती आणण्यासाठी इतर सर्व सुनांना आपल्या सोबतीस येण्यास सांगितले. इतर सर्व सुना तर तिच्यासह गेल्या आणि डाळकं आणि खुरपी घेऊन माती खणू लागल्या, त्याच क्षणी तेथे एक नाग निघतो. घाबरून मोठ्या सुनेने त्याला खुर्पीने मारण्यास सुरुवात केली असताना लहान सुनेने तिला असे करण्यास रोखले. या वर मोठ्या सुनेने नागाला सोडून दिले. तो नाग जवळच तेथेच बसून राहिला. लहान सून नागाला म्हणाली आम्ही आलोच, तू कोठेही जाऊ नकोस असे म्हणून तेथून निघून गेली. पण ती कामात व्यस्त झाली आणि नागाला म्हटलेली गोष्ट विसरली.
 
दुसऱ्या दिवशी तिला तिची गोष्ट आठवली. ती धावत धावत नागाच्या दिशेने गेली, तेथे नाग बसलेला होता. लहान सुनेने नागाला बघून ' नमस्कार नाग भाऊ ' असे म्हटले.
 
नाग म्हणाला की 'तू मला भाऊ म्हणून संबोधन केले आहेस म्हणून मी तुला क्षमा करतो', नाही तर खोटं बोलण्याच्या गुन्हा साठी मी तुला दंश केले असते. लहान सुनेने त्या साठी क्षमा मागितली तर नागाने तिला आपली बहीण बनविले.
 
काही दिवसानंतर तो साप एका माणसाचा रूप घेऊन लहान सुनेच्या घरी गेला आणि म्हणाला की 'माझ्या बहिणीची घरी पाठवणी करा.'  
 
सर्वजण म्हणाले की 'तिला तर भाऊ नाही' तर तो म्हणाला- 'की मी तिच्या लांबच्या नात्यातला भाऊ आहे, लहानपणीच बाहेर गेलो होतो'. त्याच्यावर विश्वास ठेवून घरातील माणसांनी तिला त्याचा सोबतीस पाठवले.
 
वाटेत नागाने लहान सुनेला सांगितले की मी तर तोच नाग आहोत आणि तिला घाबरण्याची काहीही गरज नाही. जेथे चालवले जाणार नाही तेथे माझी शेपटी धरून घे.
 
बहिणीने भावाचे ऐकले आणि तेथे पोहोचले जेथे सापाचे वारूळ होते. तेथील श्रीमंती आणि वैभव बघून ती आश्चर्यात पडली.
 
एके दिवशी चुकून लहान सुनेने नागाला थंड्यांच्या ऐवजी गरम दूध दिले ज्यामुळे त्याचे तोंड भाजले या वर त्या सापाची आई फार चिडली. तेव्हा सापाला वाटले की आता बहिणीला तिच्या घरी पाठवावे. या वर तिला भरपूर सोनं, चांदी आणि भेट वस्तू देऊन घरी पाठवले.
 
सापाने लहान सुनेस हिरे-मणक्यांचा एक अद्भुत हार दिला. तिची स्तुती सर्वत्र पसरली आणि राणीने देखील ऐकली. राणीने राजाकडून त्या हाराची मागणी केली. राजाच्या मंत्र्यांनी लहान सुनेकडून आणून तो हार राणीला दिला.
 
लहान सुनेने मनातल्या मनात आपल्या भावाची आठवण केली आणि म्हणाली 'भावा राणीने माझा हार हिसकवून घेतला आहे, आपण असे करा की ज्या वेळेस राणी गळ्यात हार घालेल ते साप बनून जावो आणि काढतातच पुन्हा हिरे- मणक्याचा होवो.' सापाने तसेच केले.
 
राणीकडून हार तर परत मिळाला पण, मोठ्या सुनेने तिच्या नवऱ्याची कान भरावाणी केली. नवऱ्याने आपल्या बायकोला बोलावून विचारले- 'हे पैसे तुला कोण देतं?' लहान सुनेने सापाची आठवण केली त्याच क्षणी तो प्रगट झाला. त्या नंतर लहान सुनेच्या नवऱ्याने नाग देवांचे आतिथ्य केले. त्याच दिवसापासून नागपंचमीला बायका नागाला भाऊ मानून त्याची पूजा करतात.
 
पूजा करण्याची पद्धत :
 
नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्मातून उरकल्यावर सर्वात आधी भगवान शंकराचे स्मरण करावं. त्यानंतर नाग-नागिणीच्या जोडप्याची प्रतिमे (सोनं,चांदी,तांब्याची बनलेली )च्या समोर हे मंत्र म्हणावं. -
 
अनंत वासुकी शेषं पद्मनाभ चं कम्बलम्।
शंखपाल धार्तराष्ट्रं तक्षक कालियं तथा।।
एतानि नवं नामानि नागानं चं महात्मनाम्।
सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।।
तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्।। 
 
या नंतर व्रत-कैवल्य आणि उपवास करण्याचा संकल्प घ्यावा. नाग-नागिणीच्या प्रतिमेस दुधाने अंघोळ घालावी. या नंतर शुद्ध पाण्याने अंघोळ घालून गंध, फुले, धूप,दिव्याने पूजा करून पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. पांढऱ्या कमळाचे फुल पूजेत ठेवावे आणि ही प्रार्थना करावी -
 
सर्वे नागा: प्रीयन्तां मे ये केचित् पृथिवीतले।
ये चं हेलिमरीचिस्था येन्तरे दिवि संस्थिता।।