1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. cashless transaction marathon in mumbai

एक धाव कॅशलेस ट्रांझॅक्शनसाठी मॅरेथॉनच आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेसचा नारा दिल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून नवी मुंबईतील खारघरमध्ये एक धाव कॅशलेस ट्रांझेक्शनसाठी या थीमसह मॅरेथॉनच आयोजन करण्यात आले होते.
 
प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणश सुधा चंद्रन यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. 6, 10, आणि 21 किलोमीटर अशी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, आणि रायगडमधून हजारो लोक सहभागी झाले होते.
 
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर मॅरेथॉन समितीच्या संयुक्त विद्यामाने या मॅरेथॉनच आयोजन करण्यात आलं होतं.
पुढील लेख
मुंबई विमानतळावर सव्वादोन किलो सोने जप्त