मुंबई विमानतळावर सव्वादोन किलो सोने जप्त
मुंबई विमानतळावर 2 किलो 249 ग्रॅम सोन जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाने कारवाई केली असून अहमद थमीज विमानाने दुबईहून मुंबईत आला होता. त्यावेळी तपासादरम्यान कस्टम विभागाने जप्तीची कारवाई केली.
2 किलो 249 ग्रॅम सोन्याला सिलेंडरचं शेप देण्यात आले होते. या सोन्याची किंमत 60 लाख 91 हजार 912 रूपये एवढी आहे. अत्यंत लहान अशा सिलेंडर शेपमध्ये सोने लपवण्यात आले होते. पोर्टेबल कार वॉशिंग मशिनमध्ये छोटंसे सिलेंडर शेपमधील सोने लपवण्यात आले होते.
सोन्यासोबतच 1 लाख 20 हजार रूपयांचे दोन आयफोनही जप्त करण्यात आले आहेत. म्हणेज एकूण 62 लाख 11 हजार 912 रूपयांचे सोने आणि मोबाईल जप्त केले आहेत.
अरशद एमपी नामक व्यक्तीला सोनं द्यायचे होते, असे अटक केलेल्या आरोपीचे म्हणणे आहे. अरशद एमपीलही विमानतळाबाहेर अटक करण्यात आले आहे. कस्टम विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.