1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
  4. मोदी लाटेवर अवलंबून राहू नका- अमित शहा

मोदी लाटेवर अवलंबून राहू नका- अमित शहा

amit shah
राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. कामाला लागा, केवळ मोदी लाटेवर अवलंबून राहू नका, असा सल्ला भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. 
 
अमित शहा यांनी एका प्रतिष्ठित दैनिकाशी बोलताना सांगितले, गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार महाराष्ट्राला लुटते आहे. भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचे नाव मलिन केले आहे. त्यामुळे केवळ मोदींच्या करिष्म्यावर अवलंबून न राहता  आघाडी सरकाराचा पायउतार करा. 
 
दरम्यान, मुंबईतील कोअर कमिटीच्या बैठकीत अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.  
लोकसभेत मोदी लाटेमुळे राज्यात भाजप आणि शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. याचमुळे विधानसभा निवडणुकीतही मोदी लाटेचा फायदा होईल, अशी भावना पक्षात आहे. मात्र भाजप नेत्यांनी कामाला लागण्याचा सल्ला अमित शहा यांनी दिला आहे.
About Writer
wd