संबंधित माहिती
- काश्मीरमध्ये कलम 144 ; ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, सज्जाद लोन नजरकैदेत
- महाराष्ट्र विधानसभा : राज ठाकरे आणि दोन्ही काँग्रेसचे EVMच्या निमित्ताने विरोधकांचे महाआघाडी बांधण्याचे प्रयत्न?
- विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या केमिस्ट्रीवर लक्ष, टीम इंडिया कॅरेबियन बेटांवर डंका पिटणार?
- बडोद्यात तुफान पावसात पोलिसानं असं वाचवलं 45 दिवसांच्या बाळाला
- अमरनाथ यात्रा : जम्मू आणि काश्मीरमध्ये गोंधळ का निर्माण झाला आहे?
टीम इंडियाची वेस्ट इंडीजवर 22 धावांनी मात
रोहित शर्माचं अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजनं 15.3 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 98 धावा केल्या होत्या.
पावसानं विश्रांती न घेतल्यानं अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. फलंदाजीसह गोलंदाजीतही चुणूक दाखवणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.