1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. k chandrashekhar rao

तेलंगणाचे मुख्यमंत्री अंग मेहनतीतून पैसे कमावणार

k chandrashekhar rao

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव दोन दिवसांसाठी हमाल बनणार आहेत. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच त्यांच्या पक्षाचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्तेही निधी मिळवण्यासाठी हमाल म्हणून काम करणार आहेत. चंद्रशेखर राव आणि त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वच नेते शारीरिक श्रमांमधून निधी गोळा करणार आहेत.  अंग मेहनतीतून पैसे कमावणार असल्याचं राव यांनी सांगितले. आपण कृतीतून पक्षाचे मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांसमोर एक उदाहरण ठेवू, असे राव यांनी म्हटलं आहे.

पुढील लेख
ट्विटरकडून बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन