शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By

ट्विटरकडून बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीला ट्विटर बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन करणार आहे. #ambedkarjayanti हॅशटॅग केल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेलं इमोजी येईल. ट्विटर इंडियानं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. ट्विटरनं पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे. या संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे. हे आहेत पाच हॅशटॅग 
#AmbedkarJayanti,  #अंबेडकजयंती, #DalitLivesMatter,  #JaiBhim, #जयभीम.